कोल्हापूर विभागीय बेसबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेज विजयी

0
IMG_20251211_141504

कोल्हापूर विभागीय बेसबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेज विजयी

कोल्हापूर (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स,कराड, सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेमध्ये कमला कॉलेजने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

      सलग दुसऱ्या वर्षी कॉलेजच्या बेसबॉल संघाची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचा सामना कमला कॉलेज व कराड सातारा यांच्यामध्ये झाला. या उपांत्य फेरीच्या सामन्यात कमला कॉलेज चार गुणांनी विजयी झाले. अंतिम सामना सांगली ग्रामीण विरुद्ध कमला कॉलेज कोल्हापूर (कोल्हापूर शहर) यांच्यामध्ये झाला. झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात कमला कॉलेज विजयी झाले.

    कॉलेजच्या बेसबॉल संघात कर्णधार कु. दक्षता कामीरे, कु. राजनंदनी वागवेकर, कु. जान्हवी लोकरे, कु. सिद्धी शिंदे, कु. मनाली कांबळे, कु. ज्योती कांबळे, कु. स्वाती कांबळे, कु. रिद्धी शिंदे, कु. आदिती पोवार, कु. अनुष्का झांबरे, कु. तन्वी जाखले, कु. गिरिजा विभुते, कु. वैष्णवी जाधव, कु. जान्हवी पाटील, कु. गौरी जाधव आणि कु. श्रुती चौगुले या खेळाडूंचा समावेश आहे.

   सर्व खेळाडूंना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य श्री एम. एन. जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालक श्रीमती ज्योती लेंगरे, क्रीडा शिक्षक कु.पूजा ठाकूर आणि श्री. संदीप लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *