राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस राष्ट्रीय स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करणार :-  देवराज पाटील

0
IMG_20251211_145845

सांगली प्रतिनिधी 

    12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांचा 86 वा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय स्वाभिमान दिवस म्हणून विविध उपक्रमाने साजरा करणार असलेची माहिती जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली.

    वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापणे, मिठाई वितरण, विविध खेळाचे सामने, आरोग्य शिबीरे त्याचबरोबर रुग्णालय अनाथालये, वृद्धाश्रम आणि इतर संस्थामध्ये फळे औषधे ब्लॅंकेट कपडे शैक्षणिक साहित्य वाटप करणे आदि उपक्रम राबविणे आणि विविध धर्म जात समुदाय यांच्यात एकता व बंधूता वृद्धिंगत करणे साठी उपक्रम राबविणे… त्याचबरोबर आरोग्य शिक्षण स्वच्छता वृक्षारोपण व पर्यावरण जागरूकता या क्षेत्रामध्ये लोकसहभाग वाढवणे असे अनेक विषयांचे आयोजन आहे.

     प्रत्येक तालुक्यामध्ये वरील पैकी उपक्रम घेणेत येतील असे त्यांनी सांगितले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक सरचिटणीस बाळासाहेब पाटील महिलाध्यक्ष सुस्मिता जाधव संगीता हारगे युवक शहराध्यक्ष राहुल पवार जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे प्रदेश सदस्य ताजुद्दीन तांबोळी हायुम सावनूरकर,सामाजीक  न्याय विभागाचे कुमार लोंढे, ओबीसी विभागाचे जालिंदर कटरे जेष्ठ नागरिक विभागाचे गजानन पाटील सांस्कृतिक विभागाचे प्रा. पदीप पाटील जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे यांचे सह तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *