प्राथमिक शिक्षक संघाचे पुनर्गठन करणार:-जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक झाली असून, संघटनेच्या पुढील वाटचालीस गती देण्यासाठी या सर्व तालुका कार्यकारिणीचे तातडीने पुनर्गठन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी माहिती दिली. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी आणि संघटनात्मक कार्य अधिक मजबूत करण्यासाठी मुदत संपलेल्या कार्यकारिणी त्वरित बरखास्त करून नवीन कार्यक्षम कार्यकारिणीची निवड प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या पुनर्गठनासाठी संबंधित तालुक्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक संघाच्या विविध तालुका कार्यकारिणीची मुदत नुकतीच पूर्ण आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पुनर्गठनाची प्रक्रिया, निवडणुकीची पद्धत आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
अनुभवी, उत्साही शिक्षकांना संधी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सूत्रांनुसार, ही पुनर्गठनाची प्रक्रिया लवकरच ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडली जाईल. नवीन कार्यकारिणीमध्ये अनुभवी आणि उत्साही तरुण शिक्षकांना संधी देण्यावर भर दिला जाणार आहे, जेणेकरून शिक्षकांचे वेतन, सेवाशर्ती आणि इतर अडचणी प्रभावीपणे शासनासमोर मांडता येतील. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण शिक्षक कार्यकर्त्यांना संधी देऊन महाराष्ट्रात सांगली जिल्हा शिक्षक संघ प्रबळ केला जाणार असल्याची माहिती राज्य कोषाध्यक्ष अविनाश गुरव यांनी दिली.
नव्याने गठित होणाऱ्या तालुका कार्यकारिणीकडून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची अपेक्षा यावेळी शब्बीर तांबोळी सरचिटणीस यांनी व्यक्त केली, यावेळी हबीरराव पवार, सुधाकर पाटील, रणजीत नाटेकर, महादेव हेगडे, अरुण पाटील, अशोक पाटील, तानाजी खोत फतूसो नदाफ, संतोष जगताप, संजय काटे, चंद्रकांत पाटील, मोहन माने, मोहन पवार, नंदकुमार खराडे, श्रीकांत पवार, दिलीपकुमार सानए, हणमंत गायकवाड, शिवाजी जाधव अजित पाटील, फतेसिंग पाटील, धनाजी घाडगे, शिवरुद्र बठारे, सचिन पाटील, अजिनाथ दुधावले, विश्वास पुजारी प्रदीप पवार, विकास वायदंडे, तानाजी कोइम, आसिक मुजावर हे उपस्थित होते. शरद चव्हाण यांनी आभार मानले.


