सरूड येथे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

0
IMG-20251211-WA0105

सरूड येथे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

सरूड. (प्रतिनिधी) लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चौकस बुद्धी निर्माण व्हावी त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग साकारावी साकारावीत यासाठी अशा पद्धतीच्या प्रयोग मुळे मुलांच्या बुध्दीचा विकास करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरतात, वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी विज्ञानांची कास धरा.अंधश्रध्दा दूर करा. असे मत शेकाप चे नेते भाई भारत पाटील यांनी व्यक्त केले, यावेळी गटविकास अधिकारी मंगेश कुचेवर होते.

सरूड ता. शाहूवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. सुरूवातीला शास्त्रज्ञाच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन कक्षाचे अनावरण फित कापून भाई भारत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गटविकास अधिकारी मंगेश कुचेवर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी शिक्षकांनी झटावे.बालवयातच नवतंत्रज्ञानाचे मुलांना ज्ञान द्यावे.

गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार म्हणाले की,सहावी साठी पंचायत समितीच्या शेष फंडातून सामान्यज्ञान परिक्षा घेण्यात येणार आहे.प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन कृतीतून सिद्ध करावा. प्राथमिक विभाग इ.६ वी ते ८ वी- ५३, माध्यमिक ६ वी ते ८वी.४९,इ.९ वी ते १२वी-५०,., प्राथमि शिक्षक-८ माध्यमिक शिक्षक-४ व प्रयोगशाला सहा. परिचर -.अशा १७४ साधनांची नोंद झाल्याचे विज्ञान सचीव बाबूराव शिंदे यांनी सांगितले.प्रदर्शनीय ठिकाणी उल्लास मेळाव्याचे व ग्रंथदिंडी चे आयोजन करण्यात आली होते.

प्राचार्य एस.व्ही.कुंभार यांनी स्वागत केले.यावेळी सरपंच भगवान नांगरे,उपसरपंचवंदना पाडळकर, पंचायत समिती अधिकारी पराग कानडे,शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे-पाटील,माध्यमिक पत.संस्थेचे प्रकाश कोकाटे , सदाशिव कांबळे, दिपक लाड, प्राथमिक व माध्यमिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनासाठी विज्ञान कमिटीसह अन्य समितीचे पदाधिकारी,महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. आभार शिक्षण विस्ताराधिकारी अनिल कुलकर्णी यांनी मानले. प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *