सात्विक आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली – डॉ. डी. आर. भोसले
कोल्हापूर (प्रतिनिधी) बदलत्या आहार पद्धतीमुळे आज आपण भारतीय अनेक रोगांनी ग्रासलो आहोत. यावर उत्तम उपाय म्हणून आपण सात्विक आहार घ्यायला हवा. सात्विक आहाराने आपण भारतीय अनेक आजारापासून स्वत:ला दूर ठेवू शकतो. असे मत रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापुरचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी व्यक्त केले. ते मा. शरदचंद्र पवारसाहेब यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त प्राणीशास्त्र विभाग, आरोग्य कमिटी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते.
याप्रसंगी श्रद्धा पॅथॉलॉजी लॅबचे संभाजी मंडले यांनीही विद्यार्थी व स्टाफ यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. श्रद्धा पॅथॉलॉजी लॅब सांगली यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी श्रद्धा पॅथॉलॉजी लॅबचे संभाजी मंडले, सौ. उज्ज्वला मंडले यांनीही विद्यार्थी व स्टाफ यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
ह्या आरोग्य शिबिरात महाविद्यालयाचे सेवक विद्यार्थी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरास अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. यु. एस.शेळके, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या, डॉ. एम. बी. देसाई, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे, ज्यु. विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण व महाविद्यालयाच्या सिनिअर व ज्युनिअर विभागाचचा स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक डॉ. पी. डी. परीट यांनी केले तर आभार डॉ. डी. एस. कुंभार यांनी मानले.


