पुण्यानंतरसांगलीचे नाव महाराष्ट्रवासिनांना घ्यावे लागेल:- आयुक्त सत्यम गांधी

0
IMG_20251213_170928

सांगलीची ओळख इकॉनॉमिक हब बनविणार

सांगली / प्रतिनिधी
विकसित शहर बनविण्यासाठी राजकीय नेत्यांची विकास कामांप्रती असणारी इच्छाशक्ती, कायद्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन, शहराप्रती जागरुक नागरिक आणि क्रेडाई यांचे सहकार्य आवश्यक आहे. पुढील चार ते पाच महिन्यात महापालिका क्षेत्रात तुम्हाला सुनियोजित पद्धतीने विविध विकासकामे मार्गी लागलेली दिसतील. यामुळे सांगलीत विविध उद्योग व्यवसाय येतील तसेच रिअर इस्टेटला देखील चांगले दिवस येतील. पर्यायाने सांगलीची ओळख इकॉनॉमिक हब अशी होईल. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतरसांगलीचे नाव महाराष्ट्रवासिनांना घ्यावे लागेल, असा विश्वास आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्तकेला.
नेमिनाथनगर येथे कल्पद्रुम क्रीडांगणावर आयोजित याप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते करण्यातआले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सहखजिनदार दशरथ शेट्ये, सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, परजिल्ह्यातील नागरिकांना सांगलीचा अभिमान वाटेल अशा पद्धतीने सांगलीचा विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण परदेशात गेलो की आपल्याला नियोजनबद्धरित्या शहर वसलेले आपल्याला दिसते. आपल्याकडेही कायद्याची सर्वांनी अंमलबजावणी केल्यास शहराची वाटचाल योग्य पध्दतीने होईल. मनपातील असंख्य विकासकामांचे प्रश्न प्रलंबित होते. ते मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गव्ह. कॉलनी, शामरावनगर येथील पाण्याच्या टाक्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. धामणी परिसरात लवकरच २० लाख लिटर पाणी क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात येणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहरात भुयारी गटारीचे काम एप्रिल २६ पर्यंत पूर्ण होईल. मार्च पासून शहरातील विविध भागात ई बस धावताना शहरवासियांना पहावयास मिळेल. शहरातील रस्ते चांगले झालेले नागरिकांना दिसतील. कुपवाड येथील मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच सुरु होणार आहे.
पावसाळा आला की शहरात पाणी शिरलेले आपल्याला दिसते. याकरिता शहरातील सर्व नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत. वर्ल्ड बँकेकडून १६० किलोमिटर बंदिस्त गटारी बांधण्यासाठी ६०० कोटीच्या कामास मंजूरी मिळाली आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी गटारीचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. सांगलीत कोणीही आले तर त्यांना दाखविण्यासाठी रिव्हर फ्रंट हा उपक्रम नदीकाठी राबविण्यात येणार आहे. सांगलीत भाजी मंडईचे काम झाले असून मिरजेत दोन महिन्यात मंडईचे काम पूर्ण होईल. ट्रक टर्मिनलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. इतर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सांगलीशी वाढावी यासाठी सांगलीवाडी ते हरिपूर येथे रिंग रोड करण्यात येणार असून त्याचे सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. सांगली शहरात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून विकसीत करण्यात येणार आहे. यामुळे सांगलीत नवनवीन प्रकल्प येतील. क्रेडाईने अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करुन इमारतींची बांधणी करावी असे आवाहनही आयुक्त गांधी यांनी केले.
क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे म्हणाले, शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यामध्ये रिअल इस्टेटची महत्वपूर्ण भूमिका आहे. क्रेडाईच्या माध्यमातून शहरात कोणते नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्माण होत आहेत हे सांगलीकरांना समजण्यासाठी ड्रीम होम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांमध्ये स्पर्धा नाही. ग्राहकांना विविध प्रकल्प तसेच गृह सजावटीसह, बांधकाम साहित्याची माहिती एकाच छताखाली मिळावी असा प्रदर्शनाचा हेतू आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासमवेत नुकतीच क्रेडाईच्या सदस्यांची बैठक आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित असेल तर परजिल्ह्यातील नागरिकांचा शहराकडे ओढा वाढतो असेही तावरे यांनी सांगितले.
क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी, आयुक्तांनी अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखविल्याने कोल्हापूरच्या मनपा प्रशासनानेही त्यांचे अनुकरण केल्याचे सांगितले. प्रास्ताविकास सुनील कोकितकर यांनी, बाहेरील बहुतांशीजण सांगलीत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असून लवकरच सांगलीचा कायापालट झाल्याचे दिसेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी सचिव दिलीप पाटील, खजिनदार जयेश हरिया, उपाध्यक्ष आनंदराव माळी, प्रमोद शिंदे, प्रदीप पोतदार, संतोष अष्टेकर, रोहन मेहता, राजेश कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास दिपक सूर्यवंशी, जयराज सगरे, रविंद्र खिलारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *