मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा रविवारी भव्य मेळावा ; सुजातभाई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

0
WhatsApp Image 2026-08-05 at 5.44.11 PM

माजी नगरसेवक अशोक कांबळेच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश- प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे
मिरज (प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात भाई आंबेडकर यांच्या उपस्थित 9 ऑगस्ट 2026 रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिली. मिरज मध्ये सोमनाथ साळुंखे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष क्षेत्रप्रमुख नितीन सोनवणे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, नजीर झारी, डॉ. रवीकुमार गवई, भास्कर जगताप, आनंदा हातेकर, प्रमोद वायदंडे, सागर दरबारे, शब्बीर चिवेलकर, नंदू कांबळे, अल्ताफ खतीब, सूर्यकांत कुकडे आणि सौ.चंदाताई साबळे यांच्या सहित पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडी मिरज मतदार संघ आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्षमपणे पर्यायी उभा करेल. येणाऱ्या 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी यश संपादन करेल, असे ही प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी यावेळी सांगितले. लोकनेते माजी महापौर, कालकथित विवेक कांबळे यांचे मानसपुत्र ,पँथर योद्धा आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला असून, त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला मोठा हादरा बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *