मिरजेतील कन्या महाविद्यालयात ‘फिल्ड प्रोजेक्ट आणि जॉब ट्रेनिंग’ कार्यशाळा उत्साहात

0
WhatsApp Image 2026-08-05 at 9.46.03 PM

मिरज (प्रतिनिधी)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करून त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने कन्या महाविद्यालय, मिरज येथे ‘फिल्ड प्रोजेक्ट आणि जॉब ट्रेनिंग’ या विषयावरील कार्यशाळा उत्साहात पार पडली. एनईपीनुसार पदवीच्या अंतिम वर्षातील पाचव्या सत्रात फिल्ड प्रोजेक्ट आणि सहाव्या सत्रात जॉब ट्रेनिंगचा समावेश करण्यात आला आहे. या अनुषंगाने बी.ए., बी.कॉम. तसेच एम.ए. आणि एम.कॉम. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित कार्यशाळेत संशोधनाची पद्धत, प्रकल्पाची निवड, माहिती संकलन, विश्लेषण, अहवाल लेखन तसेच जॉब ट्रेनिंगच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबाराव नाईक विज्ञान महाविद्यालय, शिराळा येथील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. मानसिंग ठोंबरे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थिनींना संशोधनासाठी विषय निवडण्यापासून प्रकल्प पूर्ण करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच विविध क्षेत्रांतील जॉब ट्रेनिंगच्या संधी आणि त्यांचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजू झाडबुके होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. माधुरी देशमुख यांनी केले, तर प्रा. डॉ. सुनिता नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मधुरा जाधव आणि प्रा. पूजा कांबळे यांनी केले. प्रा. डॉ. जे. पी. चंदनशिवे यांनी आभार मानले. कार्यशाळेचे संयोजन प्रा. मानसी शिरगांवकर, प्रा. विनायक वनमोरे, प्रा. डॉ. विद्या भोसले आणि प्रा. डॉ. संतोष शेळके यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *