मिरजेतील आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा

0
ideal school

मिरज (प्रतिनिधी)

आयडियल स्मार्ट स्कूल (सीबीएसई) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाघ व पोलीस अंमलदार नालबंद उपस्थित होते.

मुख्याध्यापिका ममता भोकरे व समन्वयक विश्वासराव पाटील यांनी अतिथींचे स्वागत करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थी मंत्रिमंडळातील पदाधिकाऱ्यांना बॅज व पद प्रदान करण्यात आले. वेदांत रोडे (अध्यक्ष), भक्ती जोशी (उपाध्यक्ष), अद्विता कोल्हार (विरोधी पक्षनेते), अनन्या जाधव (आरोग्य), सोनाक्षी मेघानी (सांस्कृतिक), समर्थ गंगधर (STEAM), इरम मुतवली (पर्यटन), नम्रता रोहिदास (क्रीडा), अक्षरा गोरड (प्रवक्ते) आणि अखिल उपाध्ये (प्रशासक) यांनी पदाची शपथ घेतली.

मार्गदर्शन करताना चंद्रकांत वाघ यांनी नेतृत्व, शिस्त व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले, तर नालबंद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षिका राजलक्ष्मी शेळके व अमोल गावडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे सोहळा यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *