विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांना ‘कलातपस्वी’ पुरस्कार प्रदान

0
IMG-20260804-WA0046

मिरज (प्रतिनिधी)

संस्कार भारती मिरज महानगर समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित नटराज पूजन सोहळ्यात यंदाचा ‘कलातपस्वी’ पुरस्कार विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांना प्रदान करण्यात आला. मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संस्कार भारती पश्चिम प्रांत अध्यक्ष शाहीर आचार्य हेमंतराजे मावळे, क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पद्मश्री योगेंद्रजी स्मृती कलातपस्वी पुरस्कारांतर्गत गुरुदेवांचा मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपये रोख देऊन गौरव करण्यात आला. याच वेळी नृत्यगुरू अमिषा करंबेळकर यांना ‘कलासन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आ. सुरेशभाऊ खाडे यांनी संस्कार भारतीच्या कार्याचे कौतुक केले, तर हेमंतराजे मावळे यांनी मिरज नगरीतून मिळालेला हा सन्मान गुरुदेवांसाठी विशेष असल्याचे सांगितले. आशीर्वचनात गुरुदेव अभ्यंकर यांनी सनातन भारतीय संस्कृतीचे महत्त्व, हिंदू समाजाच्या संघटनाची गरज आणि संस्कार भारतीच्या कार्याचे कौतुक केले. “माझ्या जन्मभूमीने केलेला हा सन्मान सर्व पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी गुरुदेवांनी लिहिलेल्या भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे या ग्रंथाच्या प्रती सांगली-मिरजेतील शाळांना भेट देण्यात आल्या. त्यानंतर अमिषा करंबेळकर व त्यांच्या शिष्यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. अध्यक्ष श्रीधर देसाई, सचिव श्रावणी देशपांडे व राजश्री शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सभागृह श्रोत्यांनी फुलून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *