आंबोलीत जत्राट येथील बेपत्ता डॉक्टरचा मृतदेह अखेर सापडला

0
Screenshot_20260805_113059

निपाणी,ता.05 (प्रतिनिधी)-
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली येथील प्रसिद्ध महादेव गड पॉईंट फिरण्यासाठी गेलेले जत्राट ता.निपाणी येथील डॉक्टर 400 फूट खोल दरीत कोसळून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार दि.4 रोजी सायंकाळी घडली होती.आज झालेल्या शोधमोहीमेत अखेर या बेपत्ता डॉक्टरांचा मृतदेह आज बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास दरीत सापडला.डॉ.आयुब सय्यद वय-46 असे मृताचे नाव आहे.
या घटनेत रेस्क्यू टीमने मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता डॉक्टरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र पाऊस आणि दाट धुक्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
आज बुधवारी सकाळी शोधमोहीमेत दरीत 150 फुटापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.त्यामुळे रेस्कूयू टीमने 400 फूट अंतरापर्यंत जाऊन त्यांचा मृतदेह शोधून काढला.आज सकाळी जत्राट येथील माजी ग्रामंपचायत अध्यक्ष रमेश भिवसे यांच्यासह 100 ते 200 कार्यकर्ते रवाना झाले होते.दरम्यान, पॉईंटवर उभारलेल्या संरक्षक कठड्यांजवळ त्यांचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या पश्‍चात पत्नी,मुलगा, 2 मुली असा परिवार आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरीत कोसळलेले डॉ. आयुब सय्यद अन्य चार जण जत्राट येथून वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला गेले होते.या घटनेमुळे निपाणीसह जत्राट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *