कमला कॉलेजमध्ये पारंपारिक दिन उत्साहात साजरा
परंपरेचे जतन व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजन
कोल्हापूर, (प्रतिनिधी) कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) येथे पारंपारिक दिन दिवस (ट्रॅडिशनल डे) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास बी.ए., बी. कॉम., आणि बी.सी.ए. विभागांतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी विद्यार्थिनींनी भारतातील विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवले. रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक दागिने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंपरेचे जतन व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


