उद्योजकासाठी व नव उद्योजकांसाठी दुबई येथे महाबीजचे आयोजन

0
उद्योजकासाठी व नव उद्योजकांसाठी दुबई येथे महाबीज्ञ चे आयोजन

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे होते, महाबीजचे जनरल सेक्रेटरी दुबई विवेक कोल्हटकर यांनी कॉन्‍फरन्सची सविस्तर माहिती दिली.

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : नव उद्योजकांसाठी व उद्योजकांसाठी तसेच आपल्या उत्पादनाला इंटरनॅशनल लेव्हलवर प्रमोशन करण्यासाठी महाबीज संस्थेकडून दर दोन वर्षांनी दुबई येथे मोठा कार्यक्रम आखला जातो, यावर्षी दुबई येथे 31 जानेवारी 2026 व 1 फरवरी 2026 अशा दोन दिवशीय महाबीज कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे, असे महाबीजच्यावतीने सांगण्यात आले.

      दुबई येथे होणाऱ्या महाबीज कॉन्फरन्समध्ये दुबईतल्या व जगातल्या सर्वात मोठ्या आफ्रिकातील तसेच एशियन कंट्री भाग घेतात व आपल्या उत्पादनाच्या व्यापारासाठी अधिक सोयीस्कर होईल किंवा ग्लोबलायझेशन करण्यासाठी या संस्थेकडून नव उद्योजकांना काही टिप्स दिल्या जातात आणि बऱ्याचशा नवीन व्यापाराचा सुद्धा शुभारंभ केला जातो, याचाच एक भाग म्हणून   कोल्हापूर येथे महाबीज या संस्थेच्यावतीने येथील शाहु स्मारक भवन येथे एका विशेष कार्यक्रमावे आयोजन केले होतं, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे होते तर अध्यक्षस्थानी ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे होते 

प्रारंभी नितीन सासटकर  यांनी महाबीज कॉन्फरन्सचं आयोजनाबद्दलची माहिती दिली व महाबीज आपल्यासाठी तशी योग्य आहे हे लक्षात आणून दिले, महाबीजचे जनरल सेक्रेटरी दुबई विवेक कोल्हटकर यांनी कॉन्‍फरन्सची सविस्तर माहिती दिली. सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी सुहास फडणीस यांनी महाबीज संस्थेच्या या उपक्रमाबद्दल माहिती दिली 

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे महणाले की, कोल्हापूरच्या प्रॉडक्टना दुबईत मार्केट उपलब्ध करून देता येईल व जास्तीत जास्त उद्योजकांना दुबईपर्यंत कसे आणता येईल याबद्दल ग्वाही दिली, महाबीज मीडिया प्रमुख दिलीप खेडेकर दुबई यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *