शिराळा नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा! पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदी
पुतण्याकडून काकांचा पराभव; भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे ११ नगरसेवक विजयी.
शिराळा ( प्रतिनिधी)
जिल्ह्यात बहुचर्चित ठरलेल्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीने भगवा झेंडा फडकवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक हे नगराध्यक्षपदी निवडून आले असून, त्यांनी आपले काका अभिजित नाईक यांचा ३७३ मतांनी पराभव केला. नगरसेवक पदासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट युतीचे ११, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ६ उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला व विजयी मिरवणूक काढण्यात आली. नगरपंचायतीवर असलेली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता भाजप-शिवसेना युतीने खेचून घेतली आहे. एकत्रित लढलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना या निवडणुकीत युतीने मोठा ‘चेकमेट’ दिला आहे.
चुरशीची ठरलेली ही लढत दिवसेंदिवस लक्षवेधी ठरली होती. यामध्ये आमदार सत्यजित देशमुख, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ॲड. भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, विराज नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
प्रभाग क्रमांक चारमध्ये अभिजित शिवाजीराव यादव यांनी अभिजित प्रतापराव यादव यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक सतरामध्ये राजसिंह पाटील यांनी प्रताप दिलवाले यांचा ३१७ या उच्चांकी मताधिक्याने पराभव केला. नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीसिंग नाईक यांनी अभिजित नाईक यांचा २७३ मतांनी पराभव केला. ‘नोटा’ (None of the Above) मतांची संख्या एकूण २५ आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी श्यामला खोत-पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी सूरज कांबळे तसेच तहसील आणि नगरपंचायत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले.
निवडणुकीची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे:
नगराध्यक्ष पदासाठी मिळालेली मते: १) निखिल कांबळे (७०) २) वसंत कांबळे (३५) ३) प्रदीप जोशी (६९) ४) अभिजित नाईक (राष्ट्रवादी) – (४९३२) ५) पृथ्वीसिंग नाईक (शिवसेना शिंदे गट) – (५२०५) ६) श्रीराम नांगरे पाटील (४७७) ७) मारुती रोकडे (१९) ८) सम्राट शिंदे (४८) ९) नोटा – २५
नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय निकाल:
- प्रभाग १: सचिन डांगे (भाजप – ३३५) विजयी. उत्तम डांगे (राष्ट्रवादी – २०५).
- प्रभाग २: शिवानी नलवडे (भाजप – ४०९) विजयी. वंदना खबाले (राष्ट्रवादी – २६१).
- प्रभाग ३: केदार नलवडे (भाजप – ५१४) विजयी. महेश खंडागळे (राष्ट्रवादी – २५४).
- प्रभाग ४: अभिजित शिवाजीराव यादव (राष्ट्रवादी पुरस्कृत – १६६) विजयी. अभिजित प्रतापराव यादव (भाजप – १६२).
- प्रभाग ५: मनस्वी निकम (भाजप – ४६५) विजयी. राजेश्री निकम (राष्ट्रवादी – ३६९).
- प्रभाग ६: सीमा कदम (राष्ट्रवादी – ३४८) विजयी. शीतल कदम (भाजप – २४७).
- प्रभाग ७: लक्ष्मी कदम (राष्ट्रवादी – ३७७) विजयी. यशोदा पवार (भाजप – २४९).
- प्रभाग ८: बसवेश्वर शेटे (भाजप – २२७) विजयी. ॲड. नरेंद्र सूर्यवंशी (राष्ट्रवादी – १६६).
- प्रभाग ९: सुनिता पाटील (भाजप – ४०१) विजयी. मंगल कुरणे (राष्ट्रवादी – १८९).
- प्रभाग १०: प्राजक्ता कुलकर्णी (भाजप – ३८३) विजयी. राधिका कुलकर्णी (राष्ट्रवादी पुरस्कृत – ३३०).
- प्रभाग ११: माधुरी गायकवाड (राष्ट्रवादी – २४७) विजयी. चांदणी उबाळे (भाजप – २३०).
- प्रभाग १२: रमेश कांबळे (भाजप – ३६५) विजयी. लालासो तांबिट (राष्ट्रवादी – १९१).
- प्रभाग १३: अर्चना कदम (राष्ट्रवादी – २९८) विजयी. स्वाती बिळासकर (भाजप – १६९).
- प्रभाग १४: रामचंद्र जाधव (भाजप – ३५७) विजयी. संतोष रणदिवे (राष्ट्रवादी – २८५).
- प्रभाग १५: अवधूत गायकवाड (शिवसेना शिंदे गट – ३८६) विजयी. ज्योतिर्लिंग पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत – २७६).
- प्रभाग १६: सविता कांबळे (राष्ट्रवादी पुरस्कृत – २८९) विजयी. कविता कांबळे (शिवसेना शिंदे गट – २७८).
- प्रभाग १७: राजसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट – ४७७) विजयी. प्रताप दिलवाले (राष्ट्रवादी – १६०).


