शालेय पोषण आहारात गैरव्यवहाराच्या चौकशीमध्ये चालढकल केल्याच्या निषेधार्थ कृती समितीचे अभिनव आंदोलन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी जुलैमहिन्यात दिले असताना कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालकानी गेली सहा महिने याच्यावर काहीच कारवाई केली नाही निव्वळ आपल्या सहकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी चौकशी करण्यासाठी चालढकल केली आहे याचा निषेध म्हणून कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने अभिनव पद्धतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका कार्यकर्त्याला भ्रष्ट शिक्षण अधिकारी बनवून टेबल खुर्चीवर बसवून त्याला कामे करण्यासाठी पैशाचा नोटा देणे, त्याच्यासमोर मटन कोंबडी असे ताट ठेवले होते आणि उपस्थित आणि बालकांच्या तोंडाचा घास खातोस काय ?असा प्रश्न विचारून त्याला चाबकाने फटकारे मारले आणि उपस्थित महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली
या आंदोलनामध्ये अशोक पोवार, कॉ .चंद्रकांत यादव, राजाभाऊ मालेकर, कादरभाई मलबारी, लहुजी शिंदे, महेश जाधव, चंद्रकांत पाटील, प्रकाश आमटे, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृत शिंदे, प्रसाद बुलबुले, सदानंद सुर्वे, सुरिंद्रन भोसले, रवींद्र कांबळे, सुनीता पाटील, कल्पना खोराटे, सुधा सरनाईक, मयुरी सुतार, रेश्मा पवार, अर्चना मार्गज, प्रकाश रांगणेकर, सुनील थोरवत, प्रसाद बुलबुले आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


