खेलो इंडिया स्पर्धेसाठी जलतरण खेळाडूंची निवड

0
खेलो इंडिया स्पर्धेसाठी जलतरण खेळाडूंची निवड

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जलतरण खेळाडूंची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी)  चेन्नई येथे 18 ते 22 डिसेंबर दरम्यान ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आयोजित जलतरण स्पर्धेमध्ये देशातील 169 युनिव्हर्सिटी मधील मुले-मुली मिळून 750 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेतून शिवाजी विद्यापीठ येथील जलतरणपटूंची सन 2025-26 शैक्षणिक वर्षात खेलो इंडिया स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.

 यामध्ये मुलीच्या विभागात धिरिजा रमेश मोरे,  अनुष्का सयाजी पाटील,  कृष्णा शेळके यांची तर मुलांच्या गटामध्ये धैर्यशील किरण भोसले, चिन्मय सुर्यवंशी यांची निवड झाली.

यांना कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलुगुरु डॉ. ज्योती जाधव , कुलसचिव डॉ. विलास शिंदे , विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख डॉ शरद बनसोडे, संघ व्यवस्थापक डॉ प्रा सुनिल खराडे व शिवाजी विद्यापीठाचे प्रशिक्षक डॉ प्रो. महेश पाटील, सुचय खोपडे , डॉ. राजेंद्र रायकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *