अनिता तावडे यांची चीनमधील पोस्ट डॉक्टोरल संशोधनासाठी निवड

0
डॉ. अनिता कुंडलिक तावडे

सांगरुळ ता.23 (प्रतिनिधी) :सांगरूळ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील मेनलँड फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड झाली आहे. हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, समाजातील अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरलेला अभिमानाचा क्षण आहे.

डॉ. अनिता तावडे यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे ही नामांकित आंतरराष्ट्रीय संधी मिळवली आहे. चीनच्या प्रतिष्ठित विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल फेलोशिप मिळणे ही कोल्हापूर जिल्ह्यातील संशोधकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे स्थानिक स्तरावर शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात नव्या प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डॉ. तावडे यांच्या या यशाबद्दल सांगरूळ आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. हा सन्मान केवळ त्यांचा वैयक्तिक नाही, तर ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण आणि संशोधनाकडे वळण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *