विजेता ग्रुप सांगलीतर्फे रविवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा ; राधेय सेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

0
1001027672

मिरज (प्रतिनिधी)
राधेय सेवा फाउंडेशन आयोजित विजेता ग्रुप सांगलीतर्फे मॅरेथॉन २०२५ स्पर्धा आयोजित केली आहे. सेवासदन हॉस्पिटलचा यात नेहमी सहभाग असतो. गेल्या ३ वर्षांपासून सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या सांगली मॅरेथॉनचे हे चौथे पर्व असून यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.

ही भव्य आरोग्य व क्रीडा चळवळ रविवार (दि.२८) सकाळी ५.०० ते १०.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख आयोजक सेवासदनचे चेअरमन डॉ. रविकांत पाटील, राधेय सेवा फाऊंडेन सांगलीचे अध्यक्ष डॉ. गणेश चौगुले, मॅरेथॉन मुख्य सल्लागार गिरीष चितळे, डॉ. पृथ्वीराज पाटील, अभिजीत चौगुले, गिरीष चौगुले, राहुल लांडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, जिल्हाधिकारी सांगली, सांगली मिरज कुपवाड आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. विश्राम लोमटे ब्रम्हनाळकर, प्रसाद दीक्षित, सिद्धार्थ गाडगीळ, कांतीलाल मारवाडी, नितीन मुळीक, संजय परमणे, सागर बिरनाळे, डॉ. सुनील काटे, डॉ. सुरेश वाघ, सुदर्शन कोष्टी, रोनक शहा, दिगंबर जगताप, सुरेंद्र बोळाज, सौ. भाव्या सत्रा उपस्थित राहणार आहेत. सदर मॅरेथॉनचे किट वितरण शनिवारी (दि. 27) रोजी कांतीलाल पुरुषोत्तम दास शहा प्रशालेत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *