वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मका वाटप
सरूड पशुवैद्यकीय विभागाचा उपक्रम
सरूड. (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समिती पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांना पौष्टिक हिरवा चारा मिळावा यासाठी शासनाने वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के अनुदानावर मका बियाण्याची वाटप चालू आहे तरी याचा लाभ गरजू शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सरूड पशुवैद्यकीय अधिकारी ए. टी. शिवगण व युवराज पाटील यांनी केले आहे.
. शासनाच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत दुग्ध व्यवसाय व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात ओला व सकस चारा उपलब्ध व्हावा शेतकऱ्यांना व पशुपालन दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदानावर मका बियाणे उपलब्ध केले आहेत तरी शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत 100% अनुदानावर बियाणे वाटप सुरू करण्यात आले आहे. गरजू शेतकऱ्यांनी चालू सातबारा व आधार कार्ड चे झेरॉक्स घेऊन पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा या योजनेचा लाभ घ्यावा अशी आवाहन करण्यात आले आहे.
.


