उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम हेच माझे बळ – विनायक यादव
प्रभाग २ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा व्यक्त केला विश्वास
मिरज (प्रतिनिधी)
प्रभाग क्र. २ मध्ये विनायक यादव यांनी झंझावाती प्रचाराला वेग दिला असून, घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा व सूचना ते जाणून घेत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य व रोजगार अशा मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम हेच माझे बळ आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करणे हेच माझे ध्येय आहे,” असे विनायक यादव यांनी सांगितले. प्रचारादरम्यान युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात विनायक यादव यांचे कार्य मोठे आहे. सामाजिक काम करणारे विनायक यादव हे उद्योगातून रोजगार आणि रोजगारातून समाजनिर्मिती ध्यास बाळगून आजपर्यंत १९५७ उद्योग निर्माण केले आहेत व वैयक्तिक युवकांना औद्योगिक कारखाने निर्माण करून दिली आहेत. अनेक युवकांना स्वतःच्या पायावर विनायक यादव यांनी उभारी दिलेली आहे. तसेच अनेक महिला उद्योगक बनल्या आहेत. मिरज औद्योगिक वसाहत मध्ये १४ एकर जागेमध्ये ५० प्लॉट निर्माण करून वेगळे उद्योग निर्माण केले आहेत आणि यामध्ये १२०० महिला आणि पुरुषांना विनायक यादव यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिर, योजनांमध्ये मदत, अनाथ, गोरगरिबी काम करून देणे, मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, ही कामे विनायक यादव यांनी प्राणपणाने केली आहेत. नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, वाचनालय, स्टडी रूम, त्याबरोबर अध्यापन सेवा केंद्रे निर्माण करणे साठी विनायक यादव यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विनायक यादव यांना अनेक पुरस्कार ही दिले गेले आहेत.


