राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये “ट्रेड फेअर डे” चे आयोजन

0
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये

कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम. गायकवाड, व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ज्युनिअर कॉलेज कॉमर्स विभागामार्फत “ट्रेड फेजर डे” चे आयोजन करण्यात आले होते. महावि‌द्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांच्या हस्ते ट्रेड फेअर डे चे उद्घाटन झाडाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी ज्युनिअर कॉलेज विभागाच्या उपप्राचार्या सौ.एल.बी. चव्हाण मॅडम उपस्थित होत्या.

स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेज कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्रा.जे.ए. कांबळे यानी केले प्रास्ताविकात त्यांनी वि‌द्यार्थांच्या व्यापारी कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, वि‌द्यार्थ्यांमध्ये ग्राहक म्हणून जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दिवसाच्या आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

यानंतर महावि‌द्यालयाचे  प्र.प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले यानी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतात वि‌द्यार्थी व शिक्षकांचे आशाप्रकारे उपक्रम राबवल्या बद्दल कौतुक केले तसेच भविष्यात चांगला व्यापारी व उद्‌द्योगक बनण्यासाठी असे उपक्रम म्हणजे पायाभरणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या ट्रेड फेअर डे निमित्त 11 वी व 12 वी सायन्स, आर्टस व कॉमर्स विभागातील अनेक वि‌द्यार्थ्यांनी भेळ, चहा-पोहे, बिर्याणी, क्लस्टर फूड, ज्युस, आप्पे, चाट इत्यादी नानाविध प्रकारचे स्टॉल उभारले होते. ट्रेड फेअर डे चे संपूर्ण नियोजन ज्युनिअर कॉलेज कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. जे. ए. कांबळे, सौ. एम. डी. पाटील, ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.सौ.एस.एस.पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. एम. जे. थोरात मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *