राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून विद्यार्थ्यावर होणारे संस्कार भविष्यातील प्रेरणादायक -प्राचार्य डॉ. व्ही. एम.पाटील
अध्यक्षस्थानी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वाय.एल. खाडे हे होते.
कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरामध्ये विद्यार्थ्यावर होणारे शैक्षणिक संस्कार भविष्यातील कठीण प्रसंगीसुद्धा प्रेरणादायक ठरतील, असा विश्वास न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम.पाटील यांनी व्यक्त केला.
न्यू कॉलेजच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वाय.एल. खाडे हे होते.
या शिबिराच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे आजीव सेवक उदय पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते आपल्या मनोगतात म्हणाले कि, ‘आज हा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसण्यामध्ये, शिबीराचे जी उद्दिष्टे आहेत ते पूर्ण होण्यामध्ये स्वयंसेवकांनी केलेले प्रामाणिक कार्य महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमाच्या प्रस्तावणेत बोलताना प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश किरूळकर म्हणाले कि, या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी या भागातील परिसर स्वच्छता केली, वृक्षारोपण केले, विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी शाळेमध्ये विविध विषयावर पथनाट्य सादरीकरण केले, गावामधून पर्यावरण जनजागृती फेरी काढली, आरोग्य तपासणीशिबिराचे आयोजन केले, विविध विषयांवर व्याख्याने संपन्न झाली इत्यादी विविध कामे या शिबिराच्या कालावधीमध्ये केलीआहेत.
या शिबिरामधील विद्यार्थी समृद्धी गुरव, प्रज्ञा कामिरी, केदार कांबळे, विन्स्लेत मनतेरीओ, स्वप्नील सावंत, सानिका पाटील, दीक्षा यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. विजय पवार यांनी मानले. या वेळी प्रकल्प अधिकारी प्रा. अविनाश पाटील, डॉ. संपदा टीकेकर, प्रा. मनीषा सुतार , प्रा. प्रशांत बोडके, प्रा. प्रशांत कुचेकर, श्री सर्जेराव खाडे, अमित कांबळे, उमेश साळुंखे, अनिकेत कांबळे, राजू मोरबाळे, जयदीप पाटील, मनीष तीरमारे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


