विद्यार्थ्यांची बौद्धिक व मानसिक क्षमता विकसित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड अत्यावश्यक

0
20251231_113610

जिल्ह्यातील सोळा शाळांना साठ लाखाहून अधिक किमतीचे शैक्षणिक प्रोजेक्ट्स प्रदान

हळदी  (प्रतिनिधी):  विद्यार्थ्यांची बौद्धिक व मानसिक क्षमता विकसित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड अत्यावश्यक असून, पुढील पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने बेटली कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा प्राथमिक शाळांना साठ लाख रुपयांहून अधिक किमतीचे अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट्स प्रदान करण्यात आल्याची माहिती बेटली कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर विश्वजित पाटील यांनी दिली.

       करवीर तालूक्यातील हळदी  येथील प्राथमिक शाळेत आयोजित शैक्षणिक प्रोजेक्ट्स प्रदान कार्यक्रमात बेटली कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर विश्वजित पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच प्रज्ञा पाटील होत्या. ते पुढे म्हणाले समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

    यावेळी युवराज वाईगडे व बाजीराव चौगले यांच्या विशेष प्रयत्नांतून शाळेस अडीच लाख रुपये किमतीचे शैक्षणिक प्रोजेक्ट्स उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बाबासाहेब पाटील आणि संभाजी चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसरपंच बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी चौगले, इंजिनिअर बाजीराव चौगले, मुख्याध्यापक राहुल ढाकणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव चौगले, प्रशांत कांबळे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *