निपाणीत उद्या भव्य शर्यती

0

बक्षिसात मिळणार युनिकॉर्न,पेल्न्डर, एचएफ डीएलक्स दुचाकी भेट

निपाणी (प्रतिनिधी)-
कृषीधन दुध उत्पादक सहकारी संघाचा 14 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भव्य जनरल बैलगाडी शर्यतीसह विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी 2026 नववर्ष दिनी हालसिध्दनाथ मंदिर ते श्रीपेवाडी ते नांगनूर मळा (डांबरी पट्टा) येथे भव्य बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याकरिता प्रथम क्रमांकास होंडा युनिकॉर्न दुचाकी, द्वितीय क्रमांकास हिरो स्प्लेंडर प्लस, तृतीय क्रमांकास एच एफ डिलक्स्‌ दुचाकी प्रदान करण्यात येणार आहे.
दि. 1 जानेवारी 2026 नववर्ष दिनी हालसिध्दनाथ मंदिर ते श्रीपेवाडी ते नांगनूर मळा (डांबरी पट्टा) येथे भव्य बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याकरिता प्रथम क्रमांकास होंडा युनिकॉर्न दुचाकी, द्वितीय क्रमांकास हिरो स्प्लेंडर प्लस, तृतीय क्रमांकास एच एफ डिलक्स्‌ दुचाकी प्रदान करण्यात येणार आहे. याच बरोबरीने शर्यत शौकीनांच्या आग्रहाखातर जनरल घोडा-बैल शर्यत आयोजित केली आहे. त्याकरिता अनुक्रमे 15000/-, 10000/-, 7000/- बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनरल घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे 10000/-, 7000/-, 5000/-रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. तर, आदत घोडा, बैल शर्यतीसाठी अनुक्रमे 7000, 5000, 3000/-रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी यामध्ये सहभागी होण्याकरिता डॉ. सचिन काटकर (9900311690), तात्यासो वालीकर (9008194792), प्रदीप इंगवले (9342444908), स्वप्निल पावले (9538571057) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व शर्यत शौकीनांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा. शर्यत यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही निकू पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *