नथुराम डवरी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर 

0
1000205699

११ जानेवारीला संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन, कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शाहूवाडी तालुक्यातील दैनिक महासत्ता चे पत्रकार नथुराम डवरी यांना नुकताच जाहीर करण्यात आला.

सामाजिक, समतेचे, बंधूभावाचे आणि निर्भीड पत्रकारितेचे त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना यापूर्वी आचार्य अत्रे, शाहू पुरस्कार तसेच अनेक क्षेत्रातील संस्थेकडून यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे तसेच यावर्षी या पत्रकार संघात मार्फत सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिला जाणार आहे. नथुराम डवरी हे गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण प्रश्न, सामाजिक न्याय आणि शेतकऱ्याचे मुद्दे सातत्याने वृत्तपत्रातून मांडले आहेत. त्यांची लेखणी ही नेहमी सत्याचा पाठपुरावा करणारी आणि वंचिताचा आवाज बनलेली आहे. त्यामुळेच ते सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण राज्यस्तरावर घेतली जात असून विविध सामाजिक संघटना, सहकारी व शैक्षणिक संस्था आणि सर्व धर्मीय समाज बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *