कमला कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
कमला कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
कोल्हापर. (प्रतिनिधी) कमला कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एम. एन. जाधव, डॉ. नीता धुमाळ, ग्रंथपाल सौ. उमिला कदम, डॉ. पूजा पाटील, डॉ. प्रविण चौगले, डॉ. सागर वाळवेकर, प्रा. निलेश क्षीरसागर, डॉ. तानाजी घागरे, प्रा. अश्विनी कुंभार, प्रा. स्वाती कांबळे व इतर प्राध्यापक तसेच विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


