कमला कॉलेजच्या संचिता व प्रणाली यांची राष्ट्रीय मिनी गोल्ड स्पर्धेसाठी निवड 

0
कमला कॉलेजच्या संचिता व प्रणाली यांची राष्ट्रीय मिनी गोल्ड स्पर्धेसाठी निवड

 नागपूर येथील राज्यस्तरीय मिनीगोल्फ स्पर्धेमध्ये चमकल्या

कोल्हापूर. (प्रतिनिधी) नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, सीताबर्डी, नागपूर येथे दि.३ ते ८ जानेवारी  दरम्यान आयोजित ११ वी ज्युनियर (मुले आणि मुलींची राष्ट्रीय मिनीगोल्फ चॅम्पियनशिप (स्ट्रोक, नॉकआउट मिनीगोल्फ) २०२५-२६ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कमला कॉलेज, कोल्हापूर मधील कनिष्ठ विभागातील खेळाडू संचिता सावंत व  प्रणाली ढाले (दोघी बारावी कॉमर्स) यांची निवड झाली आहे.

     नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय मिनीगोल्फ स्पर्धेमध्ये संचिता व प्रणाली या दोन्ही खेळाडूंनी दुहेरी स्ट्रोक या प्रकारामध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

      संचिता सावंत व  प्रणाली ढाले या दोन्ही खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, शारीरिक शिक्षण संचालिका लेफ्टनंट ज्योती लेंगरे तसेच क्रीडा शिक्षक पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *