सरुडच्या सुपुत्राचा दक्षिण कोरियाच्या विद्यापीठात डंका

0
1000204288

ऋषिकेश ढवळे यांना दक्षिण कोरियाच्या योनसेई विद्यापीठाची पीएच. डी. पदवी

सरुड. (प्रतिनिधी)  शाहूवाडी तालुक्यातील सरूड गावचे सुपुत्र व सध्या दक्षिण कोरिया येथे योनसेई विद्यापीठात शिक्षण घेत असलेले डॉ. ऋषिकेश पंडित ढवळे यांनी साहित्य विज्ञान व अभियांत्रिकी विभागात “पर्यावरणीय पुनर्सुधारणेसाठी व ऊर्जा साठवण अनुप्रयोगांसाठी एरोजेल्स” या विषयावर जगातील अव्वल ५० विद्यापीठांपैकी एक असलेल्या योनसेई विद्यापीठ, दक्षिण कोरिया येथून पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली आहे.

         ऋषिकेश ढवळे हे गेली सहा वर्षे दक्षिण कोरियातील योनसेई विद्यापीठात शिक्षण घेत विविध तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रथम लेखक म्हणून ८ संशोधन लेख तसेच सहलेखक म्हणून ४३ संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या संशोधनपर लेखांची जागतिक स्तरावर दखल घेतली आहे . 

      या संशोधन प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेसाठी त्यांचे पर्यवेक्षक प्रोफेसर ह्यूंग हो पार्क व त्यांची टीम, तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व बायोटेक्नॉलॉजी आणि भौतिकशास्त्र विभाग व तसेच सध्या हिरोशिमा विद्यापीठ जपान येथे कार्यरत असलेले असोसिएट प्रा. विनायक पारळे आणि त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठ मधील असिस्टंट प्रा . मुकुंद माळी आणि त्यांची टीम व वडील पंडित ढवळे भाऊ प्रा . डॉ . राकेश ढवळे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांच्या शैक्षणिक सहकार्यामुळे, संशोधन पायाभूत सुविधांमुळे आणि आंतरविषयक मार्गदर्शनामुळे सदर विषयातील प्रकल्पाची अंमलबजावणी व निष्कर्ष साध्य होण्यास मोलाची मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *