रयतच्या शाहू कॉलेजचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती होती
कोल्हापूर (प्रतिनिधी) राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २७ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ ह्या कालवधीत रूकडी येथे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन २७ डिसेंबर २०२५ रोजी उद्योगपती संजय भगत यांच्या हस्ते पार पडले.
ह्या प्रसंगी रूकडी गावच्या सरपंच सौ. राजश्री संतोष रूकडीकर, उपसरपंच श्रीमती पाकिजा राज मुलाणी ह्या उपस्थित होत्या. शिबिर काळामध्ये स्वंयसेवकांनी रूकडी गावचा मुख्य रस्ता व विविध गल्ल्या, ऑक्सिजन पार्क, शिवाजी पुतळा, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इ. परिसराची स्वच्छता केली. मतदान जनजागृती करण्यासाठी रूकडी गावात रॅली काढण्यात आली.
याबरोबरच कृष्णात स्वाती, डॉ. संदीप पाटील, प्रा. पी. एस. कल्लोळी, प्रा. डॉ. एम. ए. पाटील, प्रा. बाबासाहेब नदाफ यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. सामाजिक विषयावरील गटचर्चा संपन्न झाल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी रूकडी गावच्या सरपंच मा. सौ. राजश्री संतोष रूकडीकर, उपसरपंच मा. श्रीमती पाकिजा राज मुलाणी पोलीस पाटील सौ. कविता सोमनाथ कांबळे, ग्रामविकास अधिकारी मा. श्री. अजय वाघ, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रूकडीचे प्राचार्य आर. डी. माने, शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचा समारोप महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या शिबिराकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एम. लवंगारे, प्रा. के. आर. पाटील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


