निपाणी तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी अमोल नागराळे, उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे तर सचिवपदी राहूल पाटील

0

निपाणी,(प्रतिनिधी)-


निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल नरळे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे यांची तर सचिव पदी राहुल पाटील यांची निवड झाली. मंगळवारी ( ता. 6) येथील व्हीएसएम अभियांत्रिकी महाविद्यालयात संघाची वार्षिक कार्यकारणी सभा पार पडली. सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड झाली.
राहुल पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर अमोल नागराळे यांनी 2025 – 26 सालातील संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तालुका पत्रकार संघाला पत्रकार भवन निर्माण व्हावे यासाठी नगरपालिकेने जागा देण्याचा ठराव केला असून जागेचा प्रश्‍न पूर्णत्वास आला असल्याचे नागराळे यांनी सांगितले. भविष्यात संघाकडून विविध उपक्रमाचे आयोजन असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर नूतन वर्षासाठी पदाधिकारी निवडीचा विषय आल्यावर राजेश शेडगे यांनी अमोल नागराळे यांची फेरनिवड करण्याची सूचना मांडली. त्याला उपस्थित सर्वांनी एकमताने सहमती दर्शविली.
उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे यांची तर सचिव पदी राहुल पाटील यांची निवड सर्वानुमते विठ्ठल केसरकर यांनी घोषित केली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. निवडीवेळी अमर गुरव, लियाकत शिरकोळी, मधुकर पाटील, राजेंद्र हजारे, सुनील गिरी, रंगराव बन्ने यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते. पांडुरंग मधाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *