सरूड येथील महात्मा गांधी विद्यालयात पत्रकार दिन साजरा 

0
सरूड येथील महात्मा गांधी विद्यालयात पत्रकार दिन साजरा

सरूड येथील महात्मा गांधी विद्यालयात पत्रकार दिन साजरा 

सरूड (प्रतिनिधी) मराठी पत्रकारितेचे जनक दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र साजरा करण्यात येणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून सरूड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला

    यावेळी या कार्यक्रमाची प्रास्ताविक एस एम पाटील यांनी केले तर विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंभार एस व्ही यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

   यावेळी बोलताना कुंभार म्हणाले की पत्रकार हा समाज व्यवस्थित चा चौथा खांब म्हणून ओळखला जातो बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची काम केले त्यांचा वारसा पुढे चालवत सध्याची पत्रकार आपापल्या वृत्तपत्रातून समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोचवण्याची काम करत असतो पत्रकार हा वर्षभर समाजासाठी सातत्याने झटत असतो पण 6 जानेवारी या दिवशी पत्रकार दिन साजरा केला जातो याचे औचित्य साधून आपण पत्रकारांनी केलेल्या कामाची चीज व्हावे यासाठी या कार्यक्रमाची आयोजन करून त्यांचा यतुचित सत्कार करावा या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन केले 

     यावेळी महात्मा गांधी विद्यालयामार्फत सरूड येथील दैनिक पुढारी चे पत्रकार चंद्रकांत मुदुगडे, व दैनिक महासत्ताची पत्रकार नथुराम डवरी यांचा विद्यालयामार्फत सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून विद्यालयातील नाईक एस एम, तळवळकर एस एस, जाधव एन व्ही, सौ माने व्हि डी, सौ पाटील एमडी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार यादव व्ही एस यांनी मानले यावेळी या कार्यक्रमासाठी 

  ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *