कवलापुरमध्ये २७ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आ. डॉ. सुरेश खाडेंच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

0
1001098231

मिरज (प्रतिनिधी)
कवलापुर येथे आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते एकूण २७ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये २१ कोटी रुपये खर्चाची भव्य पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, ४ कोटी रुपये खर्चाच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर विकासकामाचे भूमिपूजन, २ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या कवलापुर गाव तळे सुशोभीकरणाचे लोकार्पण तसेच २५ लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम यांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी सांगितले की, मागील १५ वर्षांत २५:१५ योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, आमदार निधी, डी.पी.सी., राज्यशासन दलितवस्ती योजना, प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास योजना अशा विविध शासकीय योजनांतून कवलापुर परिसरात एकूण ९९ कोटी ९६ लाख ३ हजार रुपये इतकी भरीव विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. विकास कामांचा हा ओघ पुढील काळात देखील असाच सुरू राहील यात कधीही खंड पडणार नाही.

या कार्यक्रमास भानुदास पाटील, निवास पाटील, दीपकबापू पाटील, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कवलापुरच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *