कोमल नाईक यांना मुक्ता साळवी आई पुरस्कार प्रदान

0
1000208904

सोलापूर येथील अण्णाभाऊ साठे निवृत्त कर्मचारी संघाच्या पुरस्कार

 सरूड (प्रतिनिधी) मुक्ता साळवे यांच्या विचारांनी भारावलेल्या महिलांची आज समाजाला गरज आहे. अशा महिलाच आपल्या पुढच्या पिढीला ज्ञानसंपन्न बनवतील आणि त्यामुळेच शोषणमुक्त समाजाचे स्वप्न साकार होण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन एन. एस. खंदारे (मोहोळ)यांनी केले.

      सरूड.ता शाहूवाडी येथील प्रा. प्रकाश नाईक व प्रा. सुहास नाईक यांच्या मातोश्री कमल बाळू नाईक यांना अण्णाभाऊ साठे निवृत्त कर्मचारी संघ कुर्डुवाडी, जि. सोलापूर यांच्या वतीने देण्यात आलेल्या मुक्ता साळवे आई पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.      

     स्वागत प्रास्ताविक नागेश नाईकनवरे यांनी केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते कमल बाळू नाईक यांना मुक्ता साळवे आई पुरस्कार प्रदान करण्यात आला. गौरव चिन्ह,मानपत्र,शाल,पुस्तके व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

  यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील म्हणाले, प्रत्येक आई मुलांच्या जडणघडणीसाठी प्रचंड मोठा संघर्ष करत असते. परंतु मुलांवर योग्य संस्कार करून त्यांनासंशोधनासाठी, प्रबोधनासाठी व समाजातील दुःखी व अभावग्रस्तांसाठी लढण्यास बळ देणाऱ्या कमल नाईक यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.

   यावेळी सरपंच भगवान नांगरे, डॉ अभिमन रणदिवे पंढरपूर यांची भाषणे झाली कार्यक्रमास भगवान बुचडे, राजाराम मगदूम, रामदास व्हावळे, प्रा. दीपक तडाखे, प्रा. के. एन. पाटील,तानाजी सातपुते,वसंत काळे, अजित शिंदे,इंदुबाई सातपुते, अजिंक्य बेर्डे,शोभाताई साठे यांची उपस्थिती होती. आभार लालासाहेब नाईक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *