कमला कॉलेजच्या संचिता व प्रणाली यांना राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये रोप्य पदक
कमला कॉलेजच्या संचिता व प्रणाली यांना राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये रोप्य पदक
कोल्हापूर (प्रतिनिधी) कमला कॉलेज, कोल्हापूर मधील कनिष्ठ विभागातील खेळाडू संचिता सावंत व प्रणाली ढाले (दोघीही बारावी कॉमर्स) या खेळाडूंनी नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, सीताबर्डी, नागपूर येथे ३ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये झालेल्या ११ वी ज्युनियर (मुले आणि मुलींची राष्ट्रीय मिनीगोल्फ चॅम्पियनशिप (स्ट्रोक, नॉकआउट मिनीगोल्फ) २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दुहेरी स्ट्रोक या क्रीडा प्रकारांमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.
नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेमध्ये संचिता व प्रणाली या दोन्ही खेळाडूंची उपांत्य फेरी उत्तर प्रदेश मधील खेळाडूंसोबत झाली. यामध्ये विजयी होत दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी बिहार राज्यातील खेळाडूंसोबत झाली. अंतिम फेरीत अटीतटीच्या सामन्यात दोन्हीही खेळाडूंना रोप्यपदकावर समाधान मानावे लागले.
संचिता सावंत व प्रणाली ढाले या दोन्ही खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, शारीरिक शिक्षण संचालिका लेफ्टनंट ज्योती लेंगरे तसेच क्रीडा शिक्षक पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लागले.


