मिरजेत प्रभाग ३ मध्ये शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती ठरतेय भाजपपेक्षा वरचढ

0
shivsena

बैठका, कोपरा सभा, प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरज दि.९ (प्रतिनिधी)

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आता जोर चढू लागला असून, सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती वरचढ ठरताना दिसत आहे. ही युती भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात डोकेदुखी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सभेने कार्यकर्ते देखील चांगलेच रिचार्ज झाले आहेत. उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यास प्रभागात भाजपला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

या प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे नेते सागर वनखंडे यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांना हा परिसर उत्तम प्रकारे ओळखतो. मागील काळात दोन्ही नेत्यांनी प्रभागात चांगल्या पद्धतीने माणुसकी जपली आहे. प्रभागात बैठका, कोपरा सभा तसेच भव्य प्रचार फेऱ्यांचे आयोजन करण्यात येत असून, प्रत्येक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरात जाऊन संपर्क, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

आजवर केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा, भविष्यातील नियोजन आणि योग्य प्रशासनाचे आश्वासन देण्यात येत असून, त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या प्रभागातील सागर वनखंडे, रेश्मा चौधरी, शैला दुर्वे आणि दिगंबर जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना नेते मोहन वनखंडे सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे कसब पणाला लावून प्रचारात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *