सरूडकरांचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी अमर पाटील यांच्यावर

0
1000237223

भेडसगावचे माजी लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील

सरूड  (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील सरूड जिल्हा परिषद मतदार संघ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून या जिल्हा परिषद गटावर सरूडकरांनी 1962 पासून आपले वर्चस्व ठेवले आहे. हा बालेकिल्ला यावेळी शाबूत ठेवण्यासाठी या मतदारसंघातून राजकीय वारसा असणारे व सर्वसामान्य मिळून मिसळून राहणारे युवा कार्यकर्ते भेडसगाव चे माजी लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील यांच्यावर सरूडकर व मानसिंग गायकवाड गटातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली आहे. 

           सरूड जिल्हा परिषद मतदार संघावर माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारा हा मतदारसंघ आहे. त्याप्रमाणे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचीही राजकीय सुरुवात या मतदारसंघातून झाली त्यावेळी त्यांना या मतदारसंघाने मतदान देऊन पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा बहुमान मिळवून दिला, त्यानंतर माजी जिल्हा परिषद हंबीरराव पाटील यांनी 2017 पासून आतापर्यंत या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवत त्यांचा मुलगा अमर पाटील यांनी भेडसगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून बहुमान मिळवत आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात करत आपल्या कामाचा ठसा उमटून सर्वसामान्य लोकांत मिळून मिसळून तसेच युवकांमध्येही आपुलकी मिळवत आपला लौकिक वाढवला. त्यामुळे यावेळी त्यांच्यावर सरूड जिल्हा परिषद ची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आणि हा जिल्हा परिषद गट सरूडकरांचा  बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी दिली आहे .

    या मतदारसंघातील सरूड व भेडसगाव या मोठ्या गावाबरोबरच इतर गावानिही या जिल्हा परिषद मतदार संघातून आमदारकी खासदारकी याच्यासह पार पडलेल्या  प्रत्येक निवडणुकीत सरूडकर गटाला मतदान देऊन साथ दिली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत या जिल्हा परिषदेवर आपली पकड सरुडकर यांनी कायम ठेवले आहे. यावर्षी जिल्हा परिषदेसाठी अमर पाटील यांना उमेदवारी देऊन सरूडकर व रणवीर सिंह गायकवाड यांच्या गटाने टाकलेली जबाबदारी यशस्वी करण्यासाठी व या गटातील सरूड भेडसगाव पंचायत समितीच्या उमेदवारांना बरोबरीत घेत हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी अमर पाटील यांच्यावर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *