राजर्षी छ. शाहू कॉलेजमध्ये ट्रेड फेअरचे आयोजन

0
1000237438

उद्घाटन कोल्हापुरचे प्रसिद्ध उद्योजक मा. संग्राम पाटील यांच्या शुभहस्ते

कोल्हापूर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे २८ जानेवारी  रोजी महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग, वाणिज्य (आय. टी.) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेड फेअर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ह्या ट्रेड फेअरचे उद्घाटन कोल्हापुरचे प्रसिद्ध उद्योजक मा. संग्राम पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. ट्रेड फेअरमध्ये महाविद्यालयातील विविध विभागामार्फत चालवले जाणारे कोर्स यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. याबरोबरच विविध विभागाकडून स्टॉल उभारले जाणार आहे. यामध्ये इमिटेशन ज्वेलरी, कपडे, खाद्यपदार्थ तसेच इतर आकर्षक वस्तूं विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचे वातावरण अनुभवता येईल आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्यांचा विकास करणे तसेच व्यवसाय, विपणन आणि वित्त व्यवस्थापन या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. वस्तू निवड, किंमत ठरवणे, विक्री प्रचार प्रसार, बजेट नियोजन, नफा -तोट्याचे प्राथमिक आकलन आणि ग्राहक व्यवस्थापन यासारख्या बाबी विद्यार्थ्यांना शिकता येतील. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, संघकार्य, संवादकौशल्य आणि निर्णयक्षमता विकसित होण्यासही हा उपक्रम उपयुक्त ठरेल. महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ करवीर, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या मा. सरोज (माई) पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन सौ.संगीता  पाटील, मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, (प्रो.) डॉ. डी. आर. भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *