कॉलेज ऑफ कॉमर्स येथे एकदिवसीय कार्यशाळा

0
1000240470

व्यासपीठावर डॉ. व्ही. एन. मगदूम,डॉ.वर्षा मैंदर्गी, डॉ. आर. एस. कामत, डॉ. कविता ओझा

कोल्हापूर  (प्रतिनिधी): देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथील बीसीए विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत “Artificial Intelligence: Uses & Challenges” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. व्ही. एन. मगदूम होते. प्राचार्या डॉ.वर्षा मैंदर्गी, सायबर कॉलेज स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि एप्लिकेशन्स च्या अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. एस. कामत आणि शिवाजी युनिव्हर्सिटी, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट विभाग प्रमुख प्रा. डॉ. कविता ओझा हे प्रमुख प्रवक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध उपयोग, भविष्यातील संधी तसेच त्यासमोरील आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

       डॉ. व्ही. एन.मगदूम यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा दैनंदिन जीवनात वापर आणि शैक्षणिक दृष्टया किती उत्कृष्ट पद्धतीने वापर करू शकतो याचे महत्व विद्यार्थ्यांना अभिव्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या.डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे तंत्र मार्गदर्शन केले व अशा प्रकारच्या कार्यशाळा भविष्यातही उपयुक्त आहेत याचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यशाळेत प्रा. डॉ. आर. एस. कामत आणि प्रा. डॉ. कविता ओझा यांनी आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, सायबर सुरक्षा, ऑटोमेशन आणि डिजिटल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील AI च्या वापरावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, संचालक वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर तसेच अग्रणी महाविद्यालय योजनेचे महाविद्यालयीन समन्वयक व विधी विभाग प्रमुख डॉ. एस.एस.देसाई यांचेही मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *