सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील यांचा झंजावती प्रचार दौरा
सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील यांचा झंजावती प्रचार दौरा
सरूड (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी झंजावती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अमरसिंह पाटील तसेच सरूड पंचायत समितीच्या उमेदवार डॉ. धनश्री पाटील आणि भेडसगाव पंचायत समितीच्या उमेदवार माधुरी पाटील यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.
गावोगावी भेटी देत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी थेट जनतेशी संवाद साधला. स्थानिक विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसह भविष्यातील विकास धोरणे याबाबत त्यांनी भूमिका मांडली. पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रचार दौऱ्यादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सर्व स्तरातील नागरिकांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शवित सकारात्मक वातावरण निर्माण केले. या वेळी भाई भारत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


