कमला कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
कमला कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
कोल्हापूर (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कमला कॉलेज येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य एम.एन. जाधव, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुजय पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्ग, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


