राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत हर्षद पाटीलला सुवर्णपदक

0
हर्षद पाटील

टीम टाईम ट्रायल प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले.

कळे (प्रतिनिधी): दिबांग व्हॅली रोइंग अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या २२ व्या राष्ट्रीय एम.टी.बी. सायकलिंग स्पर्धेत कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू हर्षद युवराज पाटील याने महाराष्ट्र संघाकडून खेळत टीम टाईम ट्रायल या सायकलिंगच्या प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. ग्रामीण भागामध्ये सराव करत घरची परिस्थिती बेताची असताना त्याने मिळवलेले हे सुवर्णपदक अतिशय कौतुकास्पद आहे. त्याला वडील युवराज पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, संचालिका अश्विनी पाटील, संस्था प्रतिनिधी डॉ. नितीन पाटील, प्राचार्य डॉ.वाय. बी. गोंडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रम यमगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *