सायली आरंडेची ऑल इंडिया सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी निवड

0
सायली आरंडेची ऑल इंडिया सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी निवड

सायली आरंडे

कळे (प्रतिनिधी): विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाची खेळाडू सायली आरंडे (करंजफेन) हिची राष्ट्रीय सायकलिंग ट्रॅक क्रीडाप्रकारात ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली. येत्या २१ व २४ फेब्रुवारी रोजी गुरू नानक देव युनिवर्सिटी; अमृतसर (पंजाब) येथे स्पर्धा होणार आहे. तिने आत्तापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत आपला सहभाग नोंदवलेला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय सायकलिंग ट्रॅक प्रकारामध्ये तिने महाराष्ट्राला दोन मेडल पटकावून दिले आहे. तिला वडील तानाजी आरंडे, पंच कपिल कोळी, संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, संचालिका अश्विनी पाटील, संस्था प्रतिनिधी डॉ. नितीन पाटील, प्राचार्य डॉ. वाय. बी. गोंडे, शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक विक्रम यमगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.  Cycle trekking

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *