बौद्धिक संपदा हक्क कायदा आजच्या काळाची नवी परिभाषा : डॉ. किशोर गायकवाड

0
बौद्धिक संपदा हक्क कायदा आजच्या काळाची नवी परिभाषा डॉकिशोर गायकवाड

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. डी. आर. भोसले हे होते.

कोल्हापूर (प्रतिनिधी) बौद्धिक संपदा हक्क कायदा ही कुणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. नव्या युगात संशोधनाची क्षितिजे विस्तारत आहेत. पर्यायाने ह्या संशोधनाचे बौद्धिक संपदा हक्क घेण्याची पूर्वीच्या तुलनेत गती वाढली आहे. त्यामुळेच बौद्धिक संपदा हक्क कायदा ही आजच्या काळाची नवी परिभाषा बनू पाहत आहे. असे मत डॉ. किशोर गायकवाड यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे महाविद्यालयाच्या संशोधन कमिटीने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात बोलत होते.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. डी. आर. भोसले हे होते. डॉ. गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बौद्धिक संपदा हक्क कायद्याचा इतिहास कथन करण्याबरोबरच जगभरातील अनेक उदाहरणांच्या सहाय्याने ह्या हक्काचे महत्त्व पटवून दिले. गुरुतेज संधू, मनसुख प्रजापती, अंकिता नगरकर, जे. के रोलिंग ह्या व्यक्तींच्या बरोबरच निरमा, पार्ले, कोका – कोला, पिझा हट ह्या ब्रेडशी निगडीत अनेक नव्या गोष्टीची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बौद्धिक संपदा हक्काची नोंदणी करणे आणि तो हक्क घेणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील अधिकाधिक सेवक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाचे बौद्धिक संपदा हक्क घ्यावेत. महाविद्यालयाच्या रिसर्च सेंटरमार्फत त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व आर्थिक मदत पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

  ह्या व्याख्यानास महाविद्यालयाच्या आयक्युएसी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. एम. बी. देसाई, महाविद्यालयातील विविध विषयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या व्याख्यानाचे प्रास्ताविक विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. पी. बी. पिस्टे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्यामल हुंबरे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. अर्चना पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *