मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कमला काँलेज येथे ग्रंथ प्रदर्शन

0
1000291163

प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर (प्रतिनिधी) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय व मेहता बुक्स सेलर, कोल्हापूर यांच्या वतीने ताराराणी विद्यापीठ, कमला काँलेज मध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यामध्ये नवनवीन कथा, कादंबऱ्या, चरित्र, अवांतर वाचन, अनुवादित कथासंग्रह, कादंबरी इत्यादी विद्यार्थिनी व प्राध्यापकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच वैयक्तिक ग्रंथ खरेदीवर 20 टक्के सूट देण्यात आली.

 ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यासाठी माननीय प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील सरांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

  उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ. सागर वाळवेकर, , प्रा. अश्विनी कुंभार, प्रा. स्वाती कांबळे,प्रा. मनीषकुमार चोहान, प्रा. निलेश क्षीरसागर, प्रा. ए.के.पाटील, प्रा.डॉ.पूजा पाटील, प्रा. श्रीदेवी वाघमारे, प्रा.ज्योती लेंगरे, प्रा. श्री भोसले, प्रा. उदय आठवले, प्रा. पूजा दुधगावकर यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  ज्युनिअर विभागातील श्रीमती जे.ल. देशपांडे, श्रीमती कोकितकर, श्रीमती माधवी माळी, श्रीमती रूपाली शिंदे, श्रीमती प्रियांका माळी,श्री. भिऊगडे, श्री. पाटील, श्रीमती तेजस्विनी भोसले यांच्यासह विद्यार्थिनींनी देखील ग्रंथ प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल व सर्व ग्रंथालय कर्मचारी यांनी केले.

विद्यार्थिनींनी ग्रंथ प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *