विष्णु शिंदे यांच्या दावण कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) सर्व मंगल विवाह संस्था दहिवडी, सातारा यांच्यामार्फत देण्यात येणारा सन 2026 चा उत्कृष्ट कथासंग्रह राज्यस्तरीय पुरस्कार विष्णु शिंदे यांच्या दावण कथासंग्रहास जाहीर.
श्री शिंदे हे गेले 31 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. विद्यार्थी प्रिय आणि प्रामाणिक शिक्षक म्हणून श्री शिंदे यांची ख्याती आहे. त्याने आज अखेर व्याख्यानाचे तीन हजार पाचशे कार्यक्रम केले आहेत.
एक प्रतिभावंत लेखक, उत्कृष्ट निवेदक आणि उत्कृष्ट कुस्ती समालोचक म्हणून ते परिचित आहेत सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या राजश्री छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.


