निपाणीत आरोग्य शिबीराचा 80 हून अधिक रूग्णांनी घेतला लाभ-न्यायालयाच्या स्थापना दिनानिमीत्त विविध उपक्रम

0
IMG_20260226_122313

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

निपाणी (प्रतिनिधी)-


येथील न्यायालयाच्या 32 व्या स्थापना दिनानिमीत्त न्यायालय आवारात मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, विमा जागृतीसह विविध कार्यक्रम झाले. शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले. तर 80 हून अधिक रुग्णांनी मोफत रुग्णसेवेचा लाभ घेतला.
सकाळी 11 वाजता न्यायाधीश सुमलता बेन्नीकल, संतोषकुमार दैवज्ञ, रंजिता एस.के., बारअसोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.वैराट व मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर अध्यक्ष वैराट यांनी असोसिएशनच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर शिबीर सुरू झाले. त्यात डॉ.अर्जुन आडनाईक (कोल्हापूर) यांनी हृदयरोग, डॉ.नूतन चौगुले यांनी डोळे, गांधी रुग्णालयातील तज्ज्ञांनी रक्तदाब, शुगर, एचआयव्ही आदी तपासण्या केल्या. दुपारी डॉ.कौस्तुभ खांडके यांनी कान, नाक, घसा, तर डॉ. प्रियंका खांडके यांनी मोफत दंतरोग तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्य तपासणीसह सर्व शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद लाभला. सायंकाळी विमा सुरक्षा व कायदा या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मॅजिक शो व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दिवसभरात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वकिलांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष एम.ए.सनदी, सचिव नीलेश हत्ती, सहसचिव विजय इमनगौडर, एम.व्ही. कुलकर्णी, एस.व्ही. शिरगुप्पे, जे.ए.भोसले, डी.बी.लंबे, बी.बी.पाटील, आर.एम.संकपाळ, एस. जी. गुणके यांच्यासह सर्व वकील, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *