विज्ञान प्रदर्शनात विपुल डवरीचा ‘सूर्यमाला’ प्रयोग प्रथम क्रमांकावर
विज्ञान प्रदर्शनात विपुल डवरीचा ‘सूर्यमाला’ प्रयोग प्रथम क्रमांकावर
कोल्हापूर (प्रतिनिधी) जांयटस ग्रुप ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्या वर्धनी शिक्षण प्रसारण मंडळाच्या विद्या मंदिर, शाहूपुरी येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी विपुल विनायक डवरी याच्या ‘सूर्यमाला’ या प्रयोगाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत अनेक अभिनव प्रयोग सादर केले. त्यामध्ये विपुल डवरी याने सादर केलेला ‘सूर्यमाला’ हा प्रयोग विशेष लक्षवेधी ठरला. या प्रयोगाच्या सादरीकरणातून ग्रहांची रचना व त्यांच्या हालचालींचे सुंदर आणि सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण करण्यात आले.
या यशासाठी विपुलला शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशामुळे शाळेसह परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


