ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयातर्फे आज पालक सभा ; पानिपतकार विश्वास पाटील प्रमुख मार्गदर्शक

0
WhatsApp Image 2026-03-08 at 10.49.50 AM

मिरज (प्रतिनिधी)
ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत आज दि.८ मार्च रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मिरजेतील गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा व मेळावा होणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

पानिपतकार विश्वास पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. मोहन वनखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष व नगरसेवक सागर वनखंडे, संस्थेच्या सचिव, माजी सभापती अनिता वनखंडे उपस्थित राहणार आहेत. याबाबत संस्थेकडून माहिती देण्यात आली की, संस्थेतर्फे या ठिकाणी पालक सभा व मेळाव्याचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा, विविध उपक्रमांची माहिती तसेच आगामी शैक्षणिक योजना यावर चर्चा करण्यात येणार आहे. पानिपतकार विश्वास पाटील हे उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थेचे समन्वयक संतोष जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सविता पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे, प्रज्ञा प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते, प्री प्रायमरी विभागाच्या इन्चार्ज स्वप्नाली मेंढे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता कदम यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *