अतुलनीय समाजसेवेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून मदनी ट्रस्टचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव
मिरज (प्रतिनिधी)
ऑगस्ट 2025 मध्ये सांगली शहरात आलेल्या पुरपरिस्थितीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टने प्रशासनास मोलाचे सहकार्य केले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शहरातील वखारभाग, म्हसोबा टेकडी परिसर, इदगाह मैदान आदी भागांत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम संस्थेचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सैय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवकांनी एकजुटीने व निस्वार्थ भावनेने यशस्वीपणे पार पाडली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, “आपत्तीच्या काळात समाजासाठी तत्परतेने उभे राहणाऱ्या संस्था हीच समाजाची खरी ताकद असून ट्रस्टचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले. तसेच प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.
या प्रसंगी अध्यक्ष हाफिज सद्दाम सैय्यद, महासचिव सुफियान पठाण, मौलाना सहिल, कासिमभाई मुलानी, सिकंदरभाई जमादार, सलमान शेख, इम्रानभाई बेग, मुजम्मिल पठाण यांसह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी हा सन्मान प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याची भावना व्यक्त करत भविष्यातही समाजोपयोगी कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प व्यक्त केला.


