मेन राजाराममध्ये महिला दिन उत्साहात साजरा
महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून ती घराची धडपड,स्वप्नांची उंच भरारी आहे-शितल सोळसे
कोल्हापूर. (प्रतिनिधी) महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रीच्या सामर्थ्यांचा त्यागाचा,संघर्षाचा आणि अमर्याद कर्तृत्वाचा सन्मानाचा दिवस आहे. आपला स्वाभिमान सांभाळत आई वडील, गुरूजन यांनी केलेल्या संस्काराच्या मार्गावर चालत रहा, असे प्रतिपादन पोस्टमन शितल सोळसे यांनी व्यक्त केले. त्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
स्त्री ही केवळ घराचा आधारस्तंभ नसून संयमाने संसाराला शांती समाधान मिळते.तिच्या भक्तीने घर उजळते.तिच्या संयम, सहनशीलतेमुळे प्रत्येक अडचण दूर होते. तिचा सन्मान व आदर करूया असे विचार अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी मांडले.
याप्रसंगी हिंद कन्या छात्रालय,टाकाळा कोल्हापूर चे अधिक्षक वंदना कांबळे, भवानी मंडप येथे खेळणी विक्री करणाऱ्या पुजा शंभू साह,तसेच एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
वंदना कांबळे (अधिक्षक), प्रिया खाडे, दिशा चव्हाण, सृष्टी कंदले, प्रणाली तोडकर या विद्यार्थ्यिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका शितल पत्रावळे,अतिथी स्वागत व परिचय प्रा बाबासाहेब माळवे, सूत्रसंचालन सुषमा पाटील व आभार प्रमिला मळगे यांनी मानले.
यावेळी अयोध्या धुमाळ,दिपा लोहार,एच जे पठाण,विद्या कदम, दिपाली पाटील,पुनम माळी, माधवी खाडे, प्रणाली जांभळे,सरोजिनी चव्हाण, संगिता चव्हाण, अनिल लाड,बी टी यादव, हर्षवर्धन काटकर,संजय कुंभार, विकास पाटील, राहूल देशमुख, डॉ संतोष माने,राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळोखे,शुभम गुरव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
00000


